राज्यात रखडलेल्या लसीकरणाला दिलासा हाफकीन इन्स्टीट्यूट तयार करणार कोव्हक्सीन लस

0

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने सुरू असून केंद्रसरकारने याचे तीन टप्पे पाडले होते.पहिल्या टप्प्यात ६० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करण्यात आल,दुसरा टप्पा ५० वर्ष तर तिसरा टप्पा ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंचा समावेश केला गेला आहे.दरम्यान राज्यात लसीकरण केंद्र स्थापत त्याद्वारे लसीकरणाच व्यवस्थापन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्ण व लस यांच्यात विषम प्रमाण दिसून येत आहे.परिणामी अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ राज्यावर आली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हाफकीन इन्स्टीट्यूट मुंबई इथे लस तयार करण्याची परवानगी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली होती,त्याला मान्यता मिळाली असून हाफकीन आता लस तयार करू शकत आहे.परिणामी भविष्यात लसीचा तुटवडा कमी होऊन लसीकरण वेगाने होईल अशी आशा आहे.

दरम्यान देशात सिरम आणि भारत बायोटेक यांच्या लसीबरोबर रशियाच्या स्पुटनिक लसीलाही मान्यता देण्यात आली आहे.देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता लोकांचा जीव वाचवायचा असल्यास लसीकरण तीव्र वेगान होण जरुरी आहे अस तज्ञांच मत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.