कॅन्सरग्रस्तच्या नातेवाईकांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न मिटला; शरद पवार यांच्या हस्ते सदनिकांचे लोकार्पण

0

कोणत्याही कामाच्या बाबतीत शरद पवार स्वतः लक्ष देऊन असतात. त्या कामाच्या बाबतीत सतत ते माहिती घेत असतात हा त्यांचा स्वभाव आहे. लोकांची होणारी गैरसोय थांबली पाहिजे, लोकांना चांगल्यात चांगली सेवा मिळाली पाहिजे असा त्यांचा स्वच्छ हेतू असतो. याच बद्दल मागे जेतेंद्र आव्हाड यांनी सांगितला हा प्रसंग….

काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झाले. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटले आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. असा

मुंबईमधील टाटा कॅन्सर रुग्‍णालयात देशभरातून असंख्य रुग्ण येत असतात. त्या ठिकाणी उपचार घेत असताना बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होते. काहीना रस्त्यावर, फुटपाथवरती रात्र काढावी लागते. या समस्येवरती मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माढा या संकल्पनेतून १०० फ्लॅट टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज टाटा कॅन्सर हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर बडवे यांच्याकडे फ्लॅट ची चावी सुपूर्त करण्यात आली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.