‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार’ – विजय वडेट्टीवार

0

महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार माजला आहे. बहुतांश शहरांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. रत्नागिरी व व सातारा जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. नदीच्या काठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे तर बाजारपेठा दुकाने अशा ठिकाणी पाणी शिरले आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. चिपळूण शहराला पाण्याने वेढल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. NDRF च्या २ टीम तातडीने तेथे रवाना करण्यात आल्या आहेत. कोस्टल गार्डला बोटीच्या सहाय्याने मदतीसाठी विनंती केली आहे. जेवणाचे पाकीट तयार केले जात आहेत, पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘पुरामुळे अद्याप कुठेही जिवीतहानी झाली नाही. पूरग्रस्त भागावर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सरकार कुठेही लोकांच्या मदतीसाठी कमी पडणार नाहीत. आवश्यक असेल ती सर्वोतोपरी मदत करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढलेली पाहता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे व सोबतच राज्य सरकार जिथे मदत हवी आहे तिथे तात्काळ मदत करतांना दिसून येत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.