“लव्ह यू जिंदगी” म्हणत व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधील त्या मुलीचा संघर्ष थांबला….

0

कोरोनाने कित्येक जीवाचे मित्र, मैत्रिणी, नातलग गेले आहेत अशा सभोवतालच्या वातावरणातील माणसांचे दुःख होणे साहजिक आहे. मात्र कधीही न भेटलेल्या व्यक्तीचे असे कोरोना ने जाणे सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेले आहे. सोशल मीडियावर “लव्ह यू जिंदगी” म्हणत आयसीयू मध्ये संघर्ष करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ चांगलाच प्रेरणा देऊन गेला. मात्र तिची ही लढाई दुर्दैवाने अधुरी ठरली..

डॉ. लंगे यांनी गुरुवारी उशिरा भावनिक ट्विट करत सांगितले की “मला माफ करा, आम्ही आमची शूर मुलगी गमावलीय.. ओम शांती. कृपया तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांना हे दुःख करता यावे यासाठी प्रार्थना करा. ती पुढे म्हणाली, की “तिचे कुटुंब दुःख व्यक्त करीत आहे आणि आम्ही त्यांना ऑफर देऊनही त्यांनी कोणाकडूनही मदत घेतली नाही. मी सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीय.. मी तिच्याशी भावनिकरित्या जोडले गेले आहे. मला थोडा वेळ हवाय.” अशा प्रकारचं भावनिक नाते त्या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांचे पण जोडले गेले होते.

तिला ८ मे रोजी व्हायरल झाला त्याच वेळी त्या महिलेवर कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्या वेळी तिने एक इच्छा डॉक्टरांच्या कडे व्यक्त केली. ती म्हणाली इच्छाशक्ती वाढविण्यासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये संगीत वाजवू शकते का? असे डॉ. लंगे यांना विचारले होते. त्यावर डॉक्टरांनी तिला परवानगी दिली होती.

तिच्या जाण्याने सोशल मीडियावर नेटिझन्सन खूपच दुःखी झाले आहेत. एका गाण्यातून ऊर्जा देणारी ही मुलगी चांगलीच सर्वांच्या मनाला चटका लावून दूर सोडून गेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.