शेतकरी झाला उदार म्हणाला,”कोविड सेंटरसाठी माझ शेत मोफत वापरा.”

0

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना बेडची कमतरता पडू लागली आहे.विलगीकरण करून औषधोपचार करणेची गरज असलेल्या या आजारात मोठ्या दवाखान्यातही या रुग्णांची वेगळी सोय करावी लागते.तसेच सर्वच मोठे दवाखाने अशाप्रकारे विलगीकरणाची सोय करू शकत नाहीत.

राज्यात अनेक दानशुरांनी यावर उपाय म्हणून काही ठिकाणी कोविड सेंटर उभारत,बेडची सोय उपलब्ध करून दिली आहे.काही आमदारांनीही याबाबत पुढाकार घेतला आहे.याच प्रकारची एक हाक नांदेडमधील एका शेतकरी असलेल्या तरुणान घातली आहे.सर्व जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा त्याच्या शेतात पिकलेल्या शेंगा,माळव कितीतरीवेळा जीवलगांना फुकट देत असतो.हा शेतकरी मात्र कोविड रुग्णांना जीवलग मानत माणुसकीच्या भूमिकेतून स्वताच शेत फुकट वापरायला देण्यास तयार आहे.

नांदेड शहरात राहणारा स्वप्निल सूर्यवंशी नावाचा हा दानशूर शेतकरी असून तो नांदेड शहर संभाजी ब्रिगेडसाठीही काम करतो.शहरातील कोविड स्थिती पाहून स्वताकडून काय होता होईल तेवढी मदत करावी अशी इच्छा या तरूण शेतकरी मित्राची होती.परिणामी त्यान ट्विट करत,नांदेड शहरापासून १४ किलोमीटरवर माझी शेती आहे,कोविड सेंटर उभारण्यास ती मोफत वापराण्यास मी द्यायला तयार आहे.”अस सांगितल आहे.हे ट्विट त्यान अशोक चव्हाणांना टॅग केल आहे.

शेतकरी युवकाचा हा प्रस्ताव अनेक जणांना आवडला असून अनेक नागरिकांनी त्याच्या विचारच कौतुक केल आहे.आपल्याकडे असणारी काळी आई जिच्यावर तो मनापासून माया करतो तो ती आनंदान कोविड सेंटर उभारायला देण्यास तयार झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.