नाशिकच्या वैभवच पोलीस अधिकारी व्हायच स्वप्न राहील अधुर, पुण्यात कोरोना संसर्गान झाला दुर्दैवी मृत्यू

0

पुणे जिल्ह्यात आसपासच्या ग्रामीण भागातील तरुणाई नोकरी,शिक्षण या निमित्तान स्थिरावली आहे.पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी असून त्याला अनुसरून क्लासेस स्टडी सेंटर, खानावळी यांची अत्याधुनिक सोय पुण्यात आहे.पुण्यातील शैक्षणिक सोयी आणि त्यांचा दर्जा यांमुळे आसपासच्या जिल्ह्यातील तरुणाईची ओढही शिक्षणासाठी पुण्यात जाण्याची असते.दरम्यान पुण्यात वाढलेल औद्योगिकीकरण आणि खराडी आय टी पार्क तसेच इतर आय टी पार्क यांमुळे सातत्यान वर्दळ वाढत आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून कोरोना पुण्याला क्लेषदायक ठरला आहे.विशेषता पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या तरुणाईचे खानावळी बंद झाल्याने हाल होत आहेत.

पुण्यात यावर्षीही कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून साथ वेगाने पसरत आहे.याच साथीने वैभव शितोळे या युवकाचा बळी घेतलेला आहे.नाशिकमधील श्रीगोंदा तालुक्यातील भांडगाव इथल्या शेतकरी कुटुंबातील वैभवचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.आई,वडील,बहीण व वैभव अस चौकोनी कष्टाळू कुटुंब आज मुलाच्या कोरोनान झालेल्या मृत्यून हेलावल आहे.वैभवच 12 वी पर्यंतच शिक्षण भांडगावमध्येच पार पडल.इंजिनियरिंगसाठी त्यान नाशिक गाठल पण लहानपणापासून पोलिस अधिकारी व्हायच स्वप्न बाळगणाऱ्या वैभवन पुण्याची वाट धरली.गेली सहा वर्ष तो स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न करत होता.पोलीस अधिकारी होण्यासाठी धडपडत होता.

वैभवला कोरोना संसर्ग झाला परंतु, तो त्यात अत्यवस्थ झाला.त्याच्यावरील उपचार त्याला वाचवू शकले नाहीत.दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याच्या या चटका लावणाऱ्या मृत्यूने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्याच्या काही मित्रांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.