सिक्स पॅकची क्रेज आली तरुणाच्या अंगलट , गुप्तांगावर हा झाला परिणाम, गाठल थेट पोलीस स्टेशन!

0

पिळदार शरीर बनविण्याचे अतिवेड काहीवेळेला जीवावर बेतू शकतं. याचेच उदाहरण मध्यप्रदेशात अनुभवायला मिळाले आहे. एका तरुणाने पिळदार शरीरयष्ठी बनविण्यासाठी तब्बल तीन लाखांचे इंजेक्शन घेतले.मात्र त्यानंतर त्याच्या गुप्तांगावर असा परिणाम झाला की त्याने थेट पोलीस स्थानकात धाव घेतली आणि जिम प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मध्यप्रदेशातील इंदूरमधील चंपाबाग सियागंज गावात ही घटना घडली आहे. सदर तरुण इंदूरच्या अनुपमनगर येथील ‘वन लाईफ फिटनेस जिम’मध्ये व्यायाम करायला जायचा. यावेळी जीम प्रशिक्षक याने एका इंजेक्शनने पिळदार शरीर होते. शिवाय वजन आणि स्टॅमिना वाढत असल्याचे आमिष त्याला दाखवले. हा तरुणही त्याला बळी पडला. त्यालाही ते इंजेक्शन घेण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानेही ते इंजेक्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पैशांचीही व्यवस्था केली आणि अडीच ते तीन लाख घेऊन प्रशिक्षकने त्याला इंजेक्शन दिले. मात्र ते घेतल्यानंतर सदर तरुणाला प्रचंड त्रास होऊ लागला. त्याच्या गुप्तांगाला जळजळ व्हायला लागली आणि त्यानंतर लघवी करताना भयंकर वेदना होऊ लागल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणाला 2019 पासून बंदी असलेले स्टेरॉईड दिले जात होते. आठवड्यातून दोन ते तीन तो हे इंजेक्शन घेत होता. रविवारीही त्याने हे इंजेक्शन घेतले त्यानंतर प्रशिक्षक बॅगेत औषध ठेवायला गेला त्यावेळी त्याच्या बॅगेतून एक चिठ्ठी खाली पडली. ती वाचल्यानंतर सदर तरुणाला कळले की तो बंदी असलेली स्टेरॉईडचे इंजेक्शन त्याला देतोय. मात्र जेव्हा सदर तरुणाला त्रास झाला त्यावेळी त्याने पोलीस स्थानकात प्रशिक्षक आणि त्याचा भाऊ या दोघांविरोधात गुन्हा तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी प्रशिक्षकाला अटक केली असून त्याच्याकडून बंदी असलेले स्टेरॉईड इंजेक्शन जप्त केले तर त्याचा भाऊ फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.