देशाला “महाराष्ट्र मॉडेल” प्रमाणेच चालावे लागेल – संजय राऊत

0

महाराष्ट्रातील कोरोनाच्या बाबतीत कामगिरी ही कौतुकास्पद आहे. याची दखल velovelinghenyat आली आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात कोरोनाला यशस्वीरीत्या रोकण्यात यश आले होते. धारावी मध्ये जे यश मिळवले त्याचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. या वर्षी सुद्धा दुसऱ्या कोरोनाच्या लाटे मध्ये महाराष्ट्र सरकारने उत्तम कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे अहोरात्र काम करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना सांगितले की “उध्दव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गाव पातळीवरील यंत्रणा काम करत आहे की नाही या परिस्थितीवर लक्ष ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. इतकेच नव्हे तर देशाला सुद्धा “महाराष्ट्र मॉडेल” प्रमाणेच चालावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

कोरोना मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की या पाच – दहा वर्षात देश किती पुढे गेला मला माहीत नाही. पण या कोरोना मुळे देश २० वर्षे निश्चित मागे गेला. तसेच देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असे ही त्यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.