मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं आनंदी पंढरपूर पहायचं आहे!

0

पांडुरंगाच्या आषाढी एकादशी च्या पूजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. यंदाची शासकीय महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी साकडे घातले की “आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली.

शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले.

मुंबईवरून स्वतः गाडी चालवत राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी मनोभावे पांडुरंगाला साकडे घालत राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर यावी असे साकडे घातले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.