केंद्र सरकारने घेतला निर्णय, आता जगातील प्रत्येक लस मिळेल भारतात

0

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून, करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे देशात रेमेडीसेवर इंजेक्शन्स आणि सबंधित औषधांचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने रेमेडीसेवर इंजेक्शन्स आणि सबंधित औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तसेच, रेमेडीसेवर इंजेक्शन्स आणि सबंधित औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर देखील सरकारची करडी नजर आहे.

तसेच सध्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये करोना परिस्थिती बिकट असून, महाराष्ट्रासह अनके राज्यांमध्ये करोना विषाणूच्या साथीने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसेवर इंजेक्शन्स, रुग्णवाहिका देखील उपलब्ध होत नाहीयेत.

याच दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी, ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने मान्यता दिली आहे. त्या सर्व लसींना भारतात मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या आदेशात सरकारने ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे. त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि वडब्ल्यूएचओशी संबंधित आहेत. लशीला मंजुरी देणाऱ्यांत यूएस फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे भारतात लसींची आयात करायला आणि लसीकरण कार्यक्रमात गती आणण्यास मदत मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. तसेच, या निर्णयामुळे, औषध निर्माता कंपन्यांना विदेशी लस भारत तयार करण्याची मंजुरी मिळविणेही सोपे होईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.