केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही, म्हणून…”ममता बॅनर्जी यांनी साधला निशाणा”!

0

सोशल मीडिया वरती सध्या भाजप सरकार निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकेकाळी एकेकाळी भाजपच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या देणारा सोशल मीडिया आता भाजपला डोईजड झाला आहे. वाढलेली महागाई, कोरोनाच्या कालावधीमधील नियोजनशून्य कारभार असेल अशा गोष्टीवरून भाजप सरकारला सोशल मीडिया वरती चांगल्या प्रकारे ट्रोल करण्यात येत आहे. आज ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्या म्हणाल्या की “ट्विटरप्रमाणेच केंद्र सरकार माझ्या सरकारवरही दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सध्या ट्विटरला केंद्र सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे त्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत.

केंद्र सरकारने जारी केलेली सोशल मीडियाची नियमावली पाळण्यात ट्विटरकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने केंद्र सरकारने ट्विटरला असलेलं कायद्याचं संरक्षण काढून घेतलं आहे.

याच मुद्द्यावर आक्रमक होत या गोष्टीचा ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. “मी या कारवाईचा निषेध करते. केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही. म्हणून ते ट्विटरला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या कुणाला ते नियंत्रित करू शकत नाहीत, त्यांच्यासोबत ते असंच करत आहेत. ते मलाही नियंत्रित करू शकत नाहीत. म्हणूनच ते माझ्या सरकारला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.