मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय व्हायरल!

0

मुंबईच्या घाटकोपरमध्ये रहिवाशी भागांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला पार्किंगमध्ये उभी असलेली कार एका सिंकहोलमध्ये काही सेकंदात बुडाली. त्या भागामध्ये जोरदार पाऊस होत होता या पावसामध्ये ही कार सिंकहोलमध्ये बुडताना दिसत आहे. सुरुवातीला कारचा पुढील भाग बुडाला, नंतर मागील भाग सुद्धा पाण्यात गेला. आणि अशा प्रकारे पूर्ण कार सिंकहोलमध्ये बुडाली.

ही घटना घाटकोपरमध्ये त्रिभुवन मिठाईवालाच्या पाठीमागे रामनिवास हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. या कारचे मालक आहेत पंकज मेहता नशीब घटना घडली त्या वेळी या कार मध्ये कोणीही नव्हते. काही तासांनी पोलिसांनी आणि बीएमसी ने ही कार बाहेर काढली.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर बीएमसीने प्रेस नोटद्वारे स्पष्टीकरण दिले की, या घटनेशी बीएमसीशी काहीही संबंध नाही कारण ती जमीन सोसायटीची होती आणि विहिरीला आरसीसीद्वारे अर्धी झाकून परिसरात पार्किंगसाठी वापरले जात होते, जे बांधकाम आता ढासळले आहे आणि तिथे पार्क केलेली कार आत मध्ये बुडाली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.