तलावात मासे पकडायला गेलेल्या मुलाला मिळाले लाखो रुपये, आता संपूर्ण गाव आहे भीतीच्या सावटाखाली

0

एखाद्याला विनासायास पाचशे रुपये सापडले तरी घबाड मिळाल्याचा आनंद होतो. पैशाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर एखाद्याला ध्यानीमनी नसताना अचानक हजारो रुपये सापडले तर? असाच काहिसा प्रकार मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील अरूड या गावातील युवकाच्या बाबतीत घडलेला आहे. त्याला गावातील तलावात हजारो रुपये सापडले आणि संपूर्ण गाव कोरोना संक्रमणाच्या भीतीने घाबरत. नेमक घडल तरी काय चला पाहूया.

सोमवारी सकाळी साधारण सात वाजता खंडवा जिल्ह्यातील पंढना तहसीलमधील अरूड या गावातील कालू मच्छीमार मुलगा गावातील एका तलावात मासे पकडायला गेला. सध्या कोरोनामुळे तसही निर्बंध आहेत. या मुलाने तलावात मासे पकडण्यासाठी जाळे फेकले आणि त्याच्या जाळ्यात पाचशे, दोन हजारांच्या नोटांच बंडल आले. मुलाने आनंदाने बंडल उचलले आणि घरी आणले.ते तब्बल २०००० रुपये होते. नोटा सोडल्या आणि वाळवत ठेवल्या. मुलाच्या वडिलांना ही बाब समजताच त्यांना शंका आली की, नोटा नकलीही असू शकतात. परिणामी त्यांनी पोलीसांना कळवले पोलिसांनी नोटा असली असल्याचे सांगत ताब्यात घेतल्या.

यापूर्वीही तलावाजवळ अशी घटना घडली असून परत असे झाल्याने गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. कदाचित नोटा कोरोनामुळे संक्रमित असू शकतील किंवा इतरही काही कारण असू शकेल असे त्यांना वाटते. सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या ऋषींनी तलावाजवळ हालचाल पाहिली होती तलावाजवळ एक तवेरा येऊन थांबली व त्यातील एका व्यक्तीने तलावात काय तरी फेकले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तलावात आणखी रक्कम आहे का? आणि पैसे फेकले कोणी याचा पोलीस शोध घेत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.