आईबरोबर लहान असताना विकत होता बांगड्या आज आहे आय ए एस अधिकारी

0

गरीब परिस्थितीतून वर आलेल्या अनेक होतकरू तरुणांची सक्सेस स्टोरी आपण वाचत असतो. शैक्षणिक भरारी घेत अनेक तरुणांनी आपली ध्येय गाठली आहेत. ध्येयाचा पाठलाग करताना प्रयत्न आणि सातत्याची कास धरलेली आहे. महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून त्यांनी त्यासाठी रात्रंदिवस एक केलेला आहे. अशाच एका ध्येयाने प्रेरित तरुणाची कथा आपण आज बघणार आहोत.

महाराष्ट्रातील सोलापूर येथे राहणारा रमेश घोलप याने आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत सिव्हील सेवेत घवघवीत यश मिळवलेल आहे. रमेश घोलप आय ए एस परीक्षा पास झालेले असून झारखंड येथे त्यांची नियुक्ती झाली आहे. रमेशची परिस्थिती हलाखीची होती. वडील पंक्चरचे दुकान चालवत असत परंतु अति मद्यप्राशनाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी रमेश यांच्यावर पडली. रमेश आईबरोबर शेजारच्या गावात जात बांगड्या विकू लागले. याचवेळी एक दुर्दैवाने त्याना पोलिओ झाला. त्यांचा एक पाय अधू झाला. परंतु त्यांची अभ्यासातील हुशारी बघून त्यांना काकांकडे शिकण्यासाठी ठेवण्यात आल.

दरम्यान रमेशने २००९ साली १२ मी परीक्षा उत्तीर्ण होत डीप्लोमा केला व शिक्षकाची नोकरी केली. नोकरीत त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी आय ए एस परीक्षेची तयारी सुरू केली व नोकरी सोडली. त्यांच्या प्रयत्नाला यश येत ते अधिकारी झाले व त्यांची नियुक्ती झारखंडला झाली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.