” म्हणजे बुध्दीला लागलेला गंज कमी होईल ” चित्राताई वाघ यांना रूपालीताईंचा टोला

0

दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईतील धारावी येथील रहिवासी असून या दहशतवादासह इतर पाचजण मुंबई, युपी, दिल्ली येथे हल्ले करण्याचीयोजना होती.त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?” असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे.

चित्राताईंना महाराष्ट्रद्वेषाने एवढं पछाडलं आहे की, दहशतवादी दिल्लीत पकडले असतानाही महाराष्ट्रात पकडल्याचं सांगत आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या टॉपर आहेत ताई, आता बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रूपालीताई चाकणकर यांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिलेल आहे.

दरम्यान राज्याच महिला आयोगपद राष्ट्रवादीकडे येण्याची चर्चा असून रूपालीताई चाकणकर आणि विद्याताई चव्हाण यांची नाव आघाडीवर आहेत. काही दिवसांपासून चित्रा वाघ या सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टिका करत असून रूपालीताई चाकणकरही त्याला आक्रमक प्रत्युत्तर देत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.