“त्या” बॉलिवूड अभिनेत्री ने आजपर्यंत दान केलं १००लिटर ब्रेस्ट मिल्क!

0

अभिनेत्री आणि अभिनेते यांचा संघर्ष कायमच चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो.खरंतर वेगवेगळ्या मुलाखती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून यांच्या संघर्षाचा प्रवास उलगडला जातो. पण, कायमच पडद्यामागं असणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष मात्र पडद्याआड च असतो हेही तितकंच खरं आहे.

खूप लोकांचा संघर्ष आणि त्यांचं कर्तृत्व हे इतर लोकांच्या नजरेत सुद्धा येत नाही. आज मात्र एका कर्तुत्वशील पडद्यामागच्या कलाकारानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. एक निर्माती, अभिनेत्री म्हणून जीची ओळख आहे ती निधी परमार.सांड की आँख’ या चित्रपटाची निर्माती निधी परमार हिनं एका मुलाखतीत अविश्वसनीय खुलासा केला.

वयाच्या 37 व्या वर्षी आपण ‘एग्ज फ्रिज’ केले होते, असं तिनं सांगितलं. आई होण्याची इच्छा तर होती, पण करिअरमध्ये कुठंही मागे न राहता त्यालाच प्राथमिकता देण्याचा निर्णय निधीनं घेतला होता. स्वप्नाची मायानगरी मुंबईत येऊन एका मोठ्या संघर्षाला आपण सामोरे गेलो हे सांगताना आपण जाहिरात आणि टॅलेंट एजंट म्हणून काम पाहिल्याचं निधी म्हणाली.

काही वर्षांनीच तिची एका अशा व्यक्तीशी ओळख झाली, ज्या व्यक्तीनं पुढे तिच्याशी लग्न केलं. पण त्यांनतर आई- वडिलांपासून संपूर्ण समाजापर्यंत तिला बाळाचा विचार केव्हा करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मला स्वत:ची निर्मिती संस्था सुरु करायची होती, असं म्हणत पुढे जाऊन कुटुंबाची अखेर आपल्याला साथ मिळाल्याचं तिनं सांगितलं.

आपण आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे याची जाणीव झाल्यानंतर निधीनं गरोदरपणाचा निर्णय घेतला. वयाच्या 40 व्या वर्षी ती आई झाली, तेही अगदी नैसर्गिकरित्या.पण लॉकडाऊनच्या काळात ही आई,इतरांसाठी सुद्धा मायेचा सागर बनली.

ती यासाठी, की लॉकडाऊन काळात तिनं स्वत:चं जवळपास 100 लीटर ब्रेस्ट मिल्क तिनं दान करत प्रसूतपूर्व काळापूर्वी जन्मलेल्या बाळांना जणू नवजन्म दिला.करिअरला मुलाच्याही पुढे का निवडलं असा प्रश्न तिला कायम विचारला गेला, यावर निधी म्हणतात की “स्वत:ला निवडलं म्हणून पुढे जाऊन मी या दोघांना निवडू शकले”.

खरंतर आम्ही आजपर्यंत चित्रपटात बघितलं असेल की एक आई स्वतःच दूध लहान बाळाला,किंवा प्राण्याला पाजते पण आज निधी परमार नि हे अतुलनीय कर्तुत्व निर्माण करून समाजाला जणू मोलाचा संदेशच दिला आहे.देशात कुपोषण ही समस्या खूप जास्त वाढली आहे,यावर मात्र फक्त एका आईच दूध करू शकतं आणि हा दूरदर्शी विचार निधी परमार नि केला,आणि कित्येक लहान बाळांसाठी ती नवसंजीवनी च बनली.तिच्या या अफलातून विचारसरणीला आणि अद्वितीय कार्याला प्राईम महाराष्ट्र तिला सलाम करतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.