सुप्रियताई सुळे यांचे आभार मानत त्यांनी उभारल्या गुढ्या तोरणे!

0

मुळशी मधील लव्हार्डे गावाच्या नजदीक असणाऱ्या बावधन वस्तीवर आज लोकांनी गुढ्या तोरणे उभारून जल्लोष केला. या जल्लोषाचे वातावरण निर्माण होण्याच्या मागे कारण होते गावात स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा गावात वीज आल्याचे. खा. सुप्रियताई सुळे यांनी दोन महिन्यांच्या पूर्वी गावभेट दौऱ्यात या गावाला भेट दिली होती. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी खा. सुप्रियताई यांच्याकडे विजेच्या संदर्भात मागणी केली होती.

सुप्रिया सुळे यांनी तत्काळ मुळशी महावितरण विभागाकडे संबधित विजेच्या प्रश्नांच्या बाबत पाठपूरावा केला होता. सुप्रिया सुळे यांनी तत्काळ वीजपुरवठा करावा अशा सूचना दिल्या होत्या. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच गाव प्रकाशमान झाले होते. सहा दिवसात दोन किलोमीटर विजवहिण्या टाकून या ठिकाणी वीज आणण्यात आली आहे. वस्तीवर वीज आल्याच्या खुशीत ग्रामस्थांनी लाडू, पेढे वाटत आनंद व्यक्त केला.

ग्रामस्थांनी सुप्रियाताई सुळे यांचे जल्लोष करत नाव घेतले व मनापासून आभार मानले आहेत. आनंदाचे क्षण गुढ्या तोरणे उभारून साजरे केले जातात. आज बावधन वस्तीवर गुढ्या तोरणे उभारून जल्लोष करण्यात आला!

Leave A Reply

Your email address will not be published.