म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजपच्या खासदाराचे तोंडभरून कौतुक!

0

मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट आलेली त्या वेळी सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारचे उभ्या जगभरातून कौतुक करण्यात आले होते. धारावी मधील पॅटर्न जबरदस्त यशस्वी झाल्याने सगळेच अचंबित झाले होते. प्रशासन आणि राज्य सरकारचे धारावी मधील शिरकाव रोखणे हे कसब होते. या वर्षी आलेल्या या दुसऱ्या लाटेत पण “महाराष्ट्र पॅटर्न” यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. उभ्या देशातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.


देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते राज्य सरकार ला विविध गोष्टीवरून वेठीस धरत आहेत. राजकारण सोडून एकत्रित येण्याचा हा काळ आहे पण विरोधक अजूनही राजकारण सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत असेच चित्र आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाकरे यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. “मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमणाचा दर कमी केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. तसेच, मला विश्वास आहे, की आता रुग्णालयेही सज्ज झाली आहेत”, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार ऑक्सिजन, इंजेक्शन चा अपुरा मिळणारा केंद्राकडील साठा अशा गोष्टींची अडचण असताना पण योग्य रित्या मार्ग काढत आहे. परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.