धारावीत राहणारा इसम निघाला दहशतवादी, दिलीप वळसे पाटील आले अॅक्शन मोडमध्ये

0

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने तसेच तपासात दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.या कटात पकडला गेलेला मोहम्मद जान शेख हा अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांचा मुंबई, युपी येथे हल्ले करण्याचा कट होता. खासकरून गिरगाव चौपाटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला करायचे त्यांचे नियोजन होते.

जान मोहम्मद हा ४७ वर्षीय असून त्याला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्याच्या कुटुंबाचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे”.

दरम्यान एट एस प्रमुख विनीत अगरवाल म्हणाले, दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. त्यापैकी एक जान मोहम्मद अली मोहम्मद शेख मुंबईमधील धारावी येथे राहणारा आहे. त्याचं पाकिस्तानातील डी कपनी म्हणजेच दाऊदसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास २० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.