
Tata Mumbai Marathon यंदा 30 मे 2021 दिवशी
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर स्पर्धा लांबणीवर मुंबई मॅरेथॉन मध्ये पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर शर्यत अशा 3 विविध गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये यंदा मर्यादीत धावपटूंना प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबई (Mumbai) मध्ये ऐन थंडीत रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) या वर्षी 30 मे 2021 दिवशी आयोजित करण्यात आली आहे. कोविड 19 संकटामुळे (COVID 19) ही मुंबई मॅरेथॉन आता पुढे ढकलण्यात आली आहे. Procam International या स्पर्धेच्या प्रमोटर्सने त्याची माहिती मंगळवार, 9 फेब्रुवारी दिवशी दिली आहे.
दरम्यान प्रोकॅमने दिलेल्या माहितीनुसार, सावधगिरीने पावलं टाकत सर्वांशी चर्चा करून मोठ्या आशेने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पुढे ढकलल्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय घेताना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अॅथलिटिक्स महासंघ तसेच राज्य सरकार व अन्य प्रशासकीय विभागांसोबत बोलून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.