टाटा समूह करत आहे तब्बल इतक्या डॉक्टरांच्या जेवणाची व्यवस्था!

0

टाटा म्हणले की लोकांना स्वाभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा. त्यांनी वेळोवेळी लोकांच्या साठी भल्यासाठी काय करता येईल ते केलं. विशेष म्हणजे अडचणीच्या वेळी खंबीरपणे ते देशातील जनतेच्या मागे उभा राहतात हे सर्वश्रुत आहे. त्यांनी मागील वर्षी मदत म्हणून १५०० कोटी रुपये दिले होते. इतकेच काय जगभरात नामांकित असणारे ताज हॉटेल डॉक्टर यांच्या साठी उपलब्ध करून दिले होते.

नवी मुंबई मधील महापालिकेच्या १४ कोरोना सेंटर मध्ये रूग्णांची सेवा करणाऱ्या तब्बल दोन हजार डॉक्टर ची जेवणाच्या बाबतीत सगळी जबाबदारी टाटा समूहाने घेतली आहे. अशा अडचणीच्या प्रसंगी प्राण पणाने काम करणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था ठेवणे ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यांचे आरोग्य, आहार, विहार ही जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. शनिवारी पासून स्वतः टाटा समूहाने लक्ष देत सहकार्य करण्याच्या हेतूने मदतीचे पाऊल टाकले आहे.

ही मदत मिळावी या हेतूने खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे टाटा समूहाच्या ताज हॉटेल नवी मुंबईतील दोन हजार डॉक्टरांच्या भोजनाची व्यवस्था होऊ शकली आहे. टाटांचे उदारपण आणि राजन विचारे यांचे प्रयत्न हे फळास आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.