टास्क फोर्सच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात आठ दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय, गुजरातला फुकट वाटण्यात आलेल्या रेमेडीसेव्हरवर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

0

मुंबईत सध्या मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत मिटींग करत असून त्याला डाॅक्टर्स,डीन तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.यात डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण मांडला असून रेमेडीसेव्हर,बेड,लस इत्यादीबाबत समस्या तसेच उपाययोजना सांगितल्या आहेत.

डॉक्टरांच्या मतानुसार राज्यात आलेल्या दुसरा स्ट्रेंथ व त्याची लक्षण स्पष्ट व्हावी लागतात.काही भागात ब्रिटनचा स्ट्रेंथ आढळत असून त्यावरही उपाययोजना करण गरजेच आहे.मोठ्या प्रमाणावरील लसीकरण,कोरोना रिपोर्ट तपासणी,औषधोपचार या सर्वांच व्यवस्थापन करण गरजेच आहे.राज्यात होणारे मृत्यू टाळायचे असल्यास कोरोना चेन ब्रेक करण जरूरीच आहे त्यासाठी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन लावावा असा आग्रह त्यांनी धरला.

दरम्यान राज्यात मुंबईसह सर्वच ठिकाणी आरोग्य सुविधा वाढवण्यात आलेल्या आहेत.मुंबईत 4 जंबो कोविड सेंटर उभारली जाणार असून त्याला जून,जुलै उजाडेल अस प्रशासनान स्पष्ट केल.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गोरगरिबांच विचार करत त्यांना मदत देण्याचा तसच मध्यमवर्गींयांना लॉकडाऊन काळाची तरतूद करण्यास वेळ मिळावा याचा विचार करत तीन दिवसांचा अवधि देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री पहिल्या टप्प्यात 8 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यास आग्रही असून त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे.गुजरातच्या भाजप कार्यालयात रेमेडिसेव्हर फुकट वाटण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक होत महाराष्ट्रात रेमेडिसेव्हरचा तुटवडा जाणवत असताना अशाप्रकारे फुकट वाटायला यांच्याकडे रेमेडिसेव्हर आले कुठून असा सवाल केला आहे.भाजपच्या कार्यालयात रेमेडिसेव्हरचा साठा केला असल्याचा आरोप केला. या सर्व भूमिकेत महाराष्ट्रात 8दिवसांचा कडक लॅकडाऊन लागणार इतक नक्की

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.