गृहमंत्री पदाचा पदभार घेत दिलीप वळसे पाटील लागले कामाला

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशी लागल्याने त्यांनी राजीनामा दिला असून गृहमंत्री पद दिलीप वळसे पाटील यांना सोपवण्यात आल आहे.आज दुपारी दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला व कामास सुरुवात केली.तसेच राज्य सरकार अनिल देशमुखांवरील याचिकेला सुप्रिम कोर्टात आव्हान देणार आहे अस वळसे पाटलांनी स्पष्ट केल.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहणार असून आजी माजी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल तसेच प्रशासनात माझा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही.पोलीस सक्षमीकरण, कायदा सुव्यवस्था यांकडे लक्ष देणार असून सुशासन आणण्याचा प्रयत्न करणार आहे.राज्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटना आणि मलीन होत असलेली गृहखात्याची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कोरोना साथ वेगाने पसरत असून गर्दी नियंत्रणासाठी सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहेत.सर्व धर्मीय लोकांचे सण, यात्रा, जत्रा या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होत असून सर्वसामान्य जनता व विशेषता महिला सुरक्षा हा प्रश्न आमच्यासमोर प्रामुख्यानं असून त्यादृष्टीन प्रयत्न केले जातील.सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही दिलीप वळसे पाटलांनी दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.