“संपत्ती घ्या खर माझ्या वडिलांना वाचवा”.मुलाचा टाहो उपचाराअभावी वडिलांचा घरातच मृत्यू सातारा येथील ह्रदयद्रावक घटना

0

सातारा येथील विसावा नाका येथे राहणार अत्यंत संपन्न कुटुंब यांच्यावर कोरोनान टाहो फोडण्याची वेळ आली.घटनाक्रमानुसार सातारा येथील या कुटुंबाच्या घरातील ७५ वर्षीय वडील शनिवारी दुपारी कोरोनाबाधित आढळून आले.दरम्यान काही वेळातच त्यांना ताप चढला व धाप लागू लागली.मुलगा व सून यांनी तातडीन फोर व्हिलर बाहेर काढत वडिलांना दवाखान्यात भरती करण्याची तयारी केली.

मुलगा व सून यांनी गाडीतच विचारविनिमय करत शासकीय रुग्णालय गाठल.वडिलांची परिस्थिती डॉक्टरांना कथन करत वडिलांना तातडीन भरती करून घेण्याची विनंती केली.परंतु बेडच शिल्लक नसल्यान त्यांना अॅडमिट करून घेतल नाही.गाडीत अत्यावस्थ वडील आणि दवाखान्यातील नकार यांमुळ मुलगा व सून टेंशनमध्येच खाजगी रुग्णालयांकडे वळले.संपूर्ण शहर फिरत कोरोना रग्णांची सोय असलेले सगळे दवाखाने पाहत,विचारत चालले होते,परंतु आक्सीजन बेड उपलब्ध नसल्याने कुठेच भरती करून घेत नव्हते.मुलगा व सून हतबल झाले.

सरते शेवटी एका दवाखान्यासमोर ठिय्या मांडत “आमची संपत्ती घ्या खर आमच्या वडिलांना भरती करून घ्या”.असा टाहो दोघांनी फोडला.डाॅक्टरांनाही त्यांची आर्त हाक ऐकून गहिवरून आल,परंतु आॅक्सीजन बेड नसल्यान त्यांना भरती केल गेल नाही.या आजारात विलगीकरणाशिवाय उपचारही करता येत नाहीत.परिणामी वडील उपचाराअभावी गाडीतच तळमळत होते.अखेर हतबल होत मुलान वडिलांना घरी नेल आणि वडिलांनी अखेरचा श्वास घेत प्राण सोडला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.