घ्या ! एमपीएससी परीक्षा पुन्हा ढकलली पुढ

0

राज्यात सर्वत्र कोरोनाचा उद्रेक होत असला तरी नियोजित कार्यक्रम,परीक्षा यांच करायच काय? असे प्रश्न प्रशासनापुढे आ वासून उभे आहेत.1ते 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता सरसकट पास करण्याचा निर्णय शासनाच्या शिक्षण खात्याने दिला आहे.

परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती,वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती.

ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे पार पडली.या बैठकीत सर्वानुमते 11 तारखेची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला गेला.

वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे परिक्षेसंदर्भात विद्यार्थी संभ्रमात होते, त्यातच राज्य शासनाने कडक निर्बंध लावत विकेंड लॉकडाऊन लावला आहे.परिणामी 11 तारखेला परिक्षा होणार का? असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत होते.आता यावर निर्णय झाला असून 11 तारखेला परिक्षा होणार नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे.

या परिक्षेसंदर्भात मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनीही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली होती.त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोनही केला होता.परंतु मागील महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परिक्षार्थींनी आंदोलन केल होत, सध्या मात्र विद्यार्थ्यांची भूमिका बदलली असून त्यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.