फडणवीस, दरेकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

मुंबई : एकीकडे करोनामुळे महाराष्ट्र धगधगत असताना, दुसरीकडे राज्यात रेमेडीसिवर वरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. याचे कारण शनिवारी रात्री रेमडेसिवीरचा पुरवठा करणाऱ्यां कंपन्यांपैकी एक असलेल्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी नेत्यांनी बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात मध्यरात्री धाव घेतली. यावरून भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाड यांच्याविरोधात कारवाई करा, अशी मागणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

तसेच त्यांनी, केंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का, असा सवाल देखील मोदी सरकारला केला आहे.

रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कोटींचा रेमडेसिवीरचा साठा कुठून येतो कुठून? याचा काळा बाजार करणारे हे लोक कोण आहेत? यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

देशात गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यात देखील दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, काल दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ करोना रुग्ण सापडले आहेत, तर ५६ हजार ७८३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. मात्र या दरम्यान, काल राज्यात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यावेळी त्यांनी राज्यात, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा मोठ्या तुडवडा जाणवत असून, याला घेऊन केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर घाणेरडे राजकारण करत आहे, असे सांगत याचा निषेध केला आहे.

तसेच पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या अधिकाऱ्याची अधिक सखोल चौकशी करून, ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी मागणीसुद्धा त्यांनी पत्रात केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.