
मुंबई : श्रीलंकाविरूद्ध इंग्लंड यांच्यात सामना आजा सिडनीत खेळला गेला. आजची सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. या सामन्यात इंग्लंड संघाने 4 विकेटांनी जिंकला आहे. यासह इंग्लंड संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उद्या होणारा सामना जर भारताने जिंकला तर इंग्लंड विरूद्ध 10 नोव्हेंबरला होणार आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंका संघाने 20 षटकांत 8 बाद 141 धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाता फलंदाज पाथुुम निसांका याने 45 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. तर कुसल मेंडिसने 18 धावांची खेळी केली आहे.
England book their place in the #T20WorldCup semi-finals 🤩
🏴 are #InItToWinIt@royalstaglil | #T20WorldCup pic.twitter.com/ZRInRcZuPR
— ICC (@ICC) November 5, 2022
इंग्लंड संघाने प्रत्युत्तर देताना चांगली सुरूवात केली होती. इंग्लंड संघाचा खेळाडू बेन स्टोक्सने 36 चेंडूत 44 धावांची खेळी केली आहे. अॅलेक्स हेल्सने 47 धावांची खेळी केली आहे. त्यांच्या या दमदार खेळीने इंग्लंडने हा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
इंग्लंडच्या आजच्या विजयाने सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. ग्रुप 1 मधुन न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी निश्चित झाले आहेत. तर ग्रुप 2 मधुन कोणते संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार हे उद्या ठरणार आहे. भारत पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघाने जर उद्याचा सामना जिंकला तर भारत प्रथम क्रमांकासह सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर दुसऱ्या स्थानावर असणारा दक्षिण आफ्रिकाही प्रवेश करेल.