T20 World Cup: पावसामुळे उपांत्य फेरीचे ICC ने बदलले नियम; आता असं ठरणार विजेता कोण?

Vaishnav Jadhav

0

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या वर्ल्डकपमध्ये सातत्याने पावसाचा वत्यय पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक संघाचे सेमिफायनलच गणित बिघडलं आहे. सध्याच्या नियमाणुसार पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही संघाला 1-1 पॉइंट्स दिले जात होते. मात्र सेमीफायनल आणि फायनलच्या वेळी जर पाऊस झाला तर त्यासाठी आयसीसीने अटी जाहीर केल्या आहेत.

टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी आसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने उपांत्या आणि अंतिम सामन्यांच्या अटी जाहीर केल्या आहेत. या अटी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उपात्यफेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी जर पाऊस पडला तर ज्या स्थितीत सामना होणार तेथुनच दुसऱ्या दिवशी सामना सुरू केला जाणार आहे.

उपात्य आणि अंतिम फेरीतील सामना जर पावसामुळे थांबला. तर तो सामना नव्याने न खेळवता. डकवर्थ-लुईस नियमानुसार दोन्ही संघामध्ये 10-10 ओव्हरचा खेळवला जाणार का हे ठरवलं जाणार आहे. सुपर 12 मध्ये सामना पावसामुळे झाला नाही तर, किमान 5-5 षटकांचा खेळवला जायचा व डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेतला जायचा.

उपात्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे सामना थांबवला तर, त्यांच्या गटात उव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. गटात सर्वात अधिक विजय मिळविणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाणार आहे. याचवेळी अंतिम सामन्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघाला संयुक्तपणे विजेता घोषित केले जाणार आहे.

टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सिडनीत 9 नोव्हेंबरला होणार आहे. तर दुसरा सेमीफायनल 10 नोव्हेंबरला एडिलेड ओव्हलमध्ये होणार आहे. वर्ल्डकपचा फायनल सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात होणार आहे. हा सामना 1.30 वाजता सुरू होणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.