परदेशात मिळाले भारतीय डॉक्टरांना स्वामींचं दर्शन.हा अनुभव सर्व स्वामी भक्तांनी वाचावा

0

आम्ही मॉरिशियसला असतो..गेल्या पंचवीस वर्षात श्री स्वामी समर्थाचे थक्क करणारे अनुभव आले प्रत्येक भक्ताला येतात तसेच.पण हा तसा अनुभव म्हणजे मी चूकल्यामूळे मला झालेला दंड मला झालेली शिक्षा आणि हीच माझी अनुभूती.स्वामी आपल्यावर भरभरून प्रेम करतात आणि जेव्हा आपण चुकतो तेव्हा दंड करायचा पण अधिकार पूर्ण त्यांचाच.परवा अचानक माझ्या लक्षात आले की हल्ली स्वामींची पूजा करताना स्वामींसाठी “हीना” अत्तराचा माझ्याकडून वापर झालेला नाहीये स्वामींची मनापासून माफी मागितली म्हणाले उद्यापासून हिना अत्तराचा वापर नक्की करेन एरवी स्वामीना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी मनापासून घेतली पण हिना अत्तर मात्र माझ्याकडून राहिले.स्वामीची माफी मागितली.

दुसऱ्या दिवशी क्लिनिक मधून हाफ डे घेतला आणि संपूर्ण बाजारपेठ हिना अत्तरासाठी हिंडले प्रत्येक दुकानात सर्व प्रकारचे अत्तर होते फक्त हिना तर नव्हते एरवी हे अंतर सर्व दुकानात असते असे ही समजले प्रयत्न करून थकले बरीच ठिकाणं फिरले पण अत्तर मिळाले नाही मॉरिशस मधील पोर्टलुईस आणि कॅत्राबाॅर्न हा भाग मी संपूर्ण पालथा घातला खूप वाईट वाटले स्वामींची मनापासून क्षमा मागितली मी राहते तिथे जवळच साई बाबांचे देऊळ आहे तीन दिवस झाले देऊळ बंद असते.देवळाचे पुजारी पाठीमागेच राहतात. सकाळी फोन वर म्हणायचे संध्याकाळी देऊळ उघडून तुम्ही दर्शनाला या पण संध्याकाळी देऊळ उघडले जायचे नाही असे सलग तीन दिवस झाले आणि मग मात्र खूप भीती वाटायला लागली. स्वामींची पुन्हा पुन्हा माफी मागितली. दवाखान्यात गेले पहिला पेशंट एक सत्पुरुष आले खाली फोटो दिला आहे आमचे बोलणे अर्थातच इंग्लिश मध्ये झाले…त्यांचे तेज त्याचे अस्तीत्व त्याचे भारदस्त उंच व्यक्तीमत्व साक्षात अदभूत व लक्ष वेधणारे होते…म्हणूनच मी आमच्या सहकाऱ्यांना त्यांचे फोटो घेण्यास सांगीतले.

ते म्हणाले, हा संवाद इंग्रजी मधून झाला होता.ते: “मी खूप दिवसांपासून ‘हुक्का’ घेत आहे,त्यामुळे माझ्या घशात जळजळ होत आहे.मी: “तुम्ही धूम्रपान करता का?” ते: – “नाही,मी ‘हुक्का’ वापरतो.” मी: – “केस पेपरवर लिहिण्यासाठी कृपया मला तुमचे नाव आणि पत्ता सांगा:” – मी कॉस्मिक मॅन आहे,मी हिमालयात असतो.माझं नाव आणि पत्ता नाहीये आमचे हे संभाषण झाले त्याला माझा सर्व स्टाफ ऐकत होता.मला जेव्हा अत्तर मिळेना तेव्हा मोरिशियस मधल्या अत्तराच्या होलसेल डीलरला मी क्लीनिक मधून फोन केलेला दोन दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितले की गोडाऊन मध्ये चेक करून मी तुम्हाला कळवतो हे बोलणे दोन दिवसापूर्वी झालेले.या सत्पुरुषां ची मी जेव्हा बोलत होते त्याच वेळेस गोडाऊन मधून त्यांचा एक माणूस हीना अत्तराची मोठी बाटली घेऊन आला आणि माझ्या हातात दिली.मी हातात ती मोठी “हीना” अत्तराची स्टीलची बाटली पकडून त्यांच्या बरोबर बोलत होते…हा इतका योगायोग बघून मी पूर्ण ब्लॅन्क झाले.ते सत्पुरुष मला म्हणाले “हे काय आहे?” मी:- एक विशिष्ट प्रकारचा परफ्यूम आहे. हिना अत्तर.मी पूजा करते तेव्हा मला देवाला अर्पण करायचं आहे.” त्यांनी माझ्या हातातून बाटली घेऊन त्याचा वास घेतला,आणी एक समाधनाने हसत म्हणाले… “God lives in the heart”

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.