” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” आत्मबळ देणारा स्वामी भक्तीचा चिमुकल्या रूहीचा आलेला अनुभव, कुटुंबावरील संकट टळल.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

0

नमस्कार मित्रांनो माझे नाव धर्मराव, मी स्वामींच्या भक्तीमार्गामध्ये गेली अनेक वर्षे आहे. नोकरी संपली आणि रिटायरमेंट मध्ये माझी पत्नी दूर्वा हिच्या सहवासाने मला स्वामींची गोडी लागली. एक अत्यंत सुखी असे आमचे कुटुंब आहे मुलगा अविनाश आणि सुनबाई सायली असा अत्यंत सुखाचा संसार चालू होता. माझ्या संसाररूपी वेलाला एक छान असे फूल लागले जेव्हा अविनाशला रूही नावाची अत्यंत सुंदर अशी कन्या झाली.आज माझी नात 3 वर्षांची आहे, पण काहीतरी नजर लागेल असे व्हावे तसेच माझ्या रूहीला ओपन हार्टचा त्रास आहे. अगदी छोटी असल्यापासूनच तिचा पुण्याला इलाज चालू होता. आता रूही 3 वर्षांची झाली आणि डॉक्टरांनी आम्हाला संगितले की रूहीचे ऑपरेशन करून घ्या. बाहेरचे एक डॉक्टर येणार होते आणि मग आपण ऑपरेशन करूया असे ठरले.आमचा जीव भांड्यात होता, त्या दिवशी मी आणि दूर्वा दिवसभर स्वामींच्या केंद्रामधून हललो देखील नाही. मला आजाहि आठवते 27 जानेवारीचा तो दिवस होता, ऑपरेशन साथी लागणारे पैसे जमवण्यासाठी अविनाश जीवाचा आटापिटा करत होता. पैसे जमतील अशी काही तजवीज मी देखील केली होती आणि पैशाचा प्रश्न जवळपास सोडवला गेला होता. स्वामींच्या पुढे गार्हाणे घेऊन मी आणि दूर्वा बसलो होतो, ‘स्वामी ! असे आमचे काय चुकले ? की या लहान जीवांना आमच्या पापांची शिक्षा देताय’ मनामध्ये स्वामी आणि रूही या दोघांचाच विचार चालू होता.निराश मनाने आम्ही दोघे घरी आलो, संध्याकाळी जेवण उरकले आणि मग झोपी गेलो.

आज का कुणास ठाऊक खूप चांगली अशी झोप लागली. मनावरचे कसले तरी दडपण दूर झाले होते, काहीतरी चांगले होईल ही भावना होती. रात्री मध्यरात्री अचानक मला स्वप्न पडले, स्वप्नामध्ये माझे दैवत स्वामी महाराज माझ्याशी बोलत होते. स्वामी म्हणाले, ‘तू काहीही काळजी करू नकोस ! मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझे दू:ख संपले समज, त्या लहान जीवाला काहीही होणार नाही’. सकाळी मी उठलो आणि दूर्वाला ही सगळी गोष्ट सांगितली. दोघांनीही मग स्वामींच्या फोटोपुढे जाऊन हात जोडले.अविनाश काल आलाच नवता. का नसेल आला ? जीवाला घोर लागला होता, फोन लावला तर बंद सांगत होते. संध्याकाळचे जवळपास 4 वाजले असतील अशा वेळी अविनाशने घरात प्रवेश केला, झुकलेले खांदे.. सकाळपासून आंघोळ नसल्यामुळे निस्तेज दिसणारा चेहरा. घरात घुसताच दूर्वाच्या कुशीत घुसत तो रडायला लागला, ऐन टायमाला मित्राने धोका दिला … पैसे द्यायला त्याने नकार दिला. सर्वांना धक्का बसला, 10 दिवसांनी ऑपरेशन करायचे होते आणि पैसे नाहीत !अविनाशला घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो, कारण त्यांचा सल्ला महत्वाचा होता .. सर्वात महत्वाचा ! डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली तेव्हा डॉक्टर म्हणाले, की ऑपरेशन तर करावेच लागेल पण तुमच्याकडे पैसे नाहीत तर आपण एक महिना ऑपरेशन पुढे ढकलूया, पण ऑपरेशनच्या आधी केल्या जाणार्‍या टेस्ट मात्र नियोजित वेळीच करूया. तसे त्यांनी बाहेरच्या डॉक्टरांना देखील कळवले आणि 9 तारखेला यायला संगितले.9 फेब्रुवारीचा दिवस होता, दूर्वा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन बसली, ती आजचा दिवस ईश्वराशी झगडणार होती आणि नियतीला बदलवण्याचा वेडा प्रयत्न करत होती.

मी, अविनाश आणि सायली तिघ रूहीला घेऊन दवाखान्यामध्ये सगळ्या टेस्ट करण्यासाठी म्हणून गेलो होतो. स्वामीचे स्वप्न डोक्यात होते पण ते निव्वळ एक स्वप्न होते. बराच वेळ टेस्ट चालल्या आणि रिपोर्ट यायला देखील बराच वेळ लागला. साधारण 4 तासांनी रिपोर्ट आले असतील.रिपोर्ट डॉक्टरांकडे गेले, काही वेळामधेच डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावले. डोक्टरांचा चेहरा विचित्र आणि टेंशनमध्ये असल्यासारखा होता, आमच्या पायाखालची जमीनच हलयाची आता बाकी राहिली होती. डॉक्टरांनी एक कटाक्ष सगळ्यांकडे टाकला आणि विचारले ‘नेमके तुम्ही काय केले ?’ आम्हाला प्रश्न कळला नाही आणि आम्ही काहीतरी अनपेक्षित आणि वाईट ऐकायला मिळणार असे वाटत होते. ‘रूहीचा ब्लॉक भरतोय… तो खूप जास्त कमी झालाय, मला नाही वाटत ऑपरेशनची गरज आहे.. तुम्ही असे केले काय ?’. डॉक्टरांच्या या शब्दांनी आम्हाला आकाश ठेंगणे झाले. मी माझ्या स्वप्नाबद्दल त्यांना संगितले आणि स्वामींना हात जोडले. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

Leave A Reply

Your email address will not be published.