स्वच्छता अभियानात सहभागी होत महाराष्ट्रातील मंत्र्याने रुग्णालय केलं स्वच्छ!

0

संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा आदर्श घेत महाराष्ट्रामध्ये स्वच्छते बाबतीत गाडगेबाबा यांची स्वच्छतेची शिकवण आदर्श मानत आचरणात आणली जाते.

याचीच प्रचिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालय स्वच्छ केल्यानंतर जाणीव झाली त्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे विविध उपक्रमांत सहभागी होत असतात. आपल्या कामकाजाच्या सोबतच आपलाही खारीचा वाटा चांगल्या कामात असला पाहिजे या हेतूनं ते काम करत असतात. त्यांनी मालेगाव येथील शहरातील रुग्णालयाला व कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी रुग्णांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

तसेच त्यांनी मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालय,सहारा,म.स.गा. कोविड केंद्रांसह महिला व बाल रुग्णालय येथे आयोजित कोविड केंद्रांतील स्वच्छतेच्या अभियानात सहभागी सहभाग घेत झाडून काढले. एका महत्त्वाच्या पदावरील मंत्र्याची ही कामगिरी पाहून सगळ्यांनीच तोंडात बोट घालत कौतुक केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.