अजून सूर्यवंशम ७८ वर्षे सोनी मॅक्स वरती दिसणार!

0

१९९९ रिलीज झालेला महानायक अमिताभ बच्चन यांचा चित्रपट सूर्यवंशम सोनी मॅक्स वरती सर्वाधिक प्रसारित करण्या आला आहे.

सर्वाधिक प्रदर्शित होण्याचा विक्रम त्याच्या नावावर ती आहे. हा चित्रपट अनेकदा टीव्ही पाहत असताना आपण पाहिला असेल. या चित्रपटाविषयी सोशल मीडिया वरती पोस्ट मिमस व्हायरल होत असतात. या मागे एक रंजक गोष्ट आहे.

या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका केली आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी डबल रोल केला आहे. या चित्रपटाला थेटर मध्ये फार काही प्रतिसाद मिळाला नाही मात्र या चित्रपटाला टीव्ही वरती जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

टीव्ही वरील हे यश पाहून चित्रपट रिलीझ झाल्यानंतर २ महिन्यांनी सोनी मॅक्स चॅनेल सुरू करण्यात आले होते. याच चॅनेलने सूर्यवंशम या चित्रपटाचे १०० वर्षांपर्यंतचे हक्क विकत घेतले आहेत. त्यांपैकी २२ वर्षे आता पूर्ण झाली आहेत आणि सोनी मॅक्सकडे अद्याप ७८ वर्षांचे हक्क बाकी आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट अभिनेत्री रेखाशीही संबंधित आहे.

वास्तविक, चित्रपटात अमिताभ बच्चन (दोघे ठाकूर भानु प्रताप आणि हीरा ठाकूर) यांच्या पत्नीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्रींना (जयसुधा आणि सौंदर्या) रेखाने आवाज दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.