
सुरेश वाडकरनी या कारणास्तव माधुरी दीक्षितला लग्नाला दिला नकार
माधुरी दीक्षित या मराठमोळ्या अभिनेत्रीन हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल १० वर्ष राज्य केल. श्रीदेवी, मिनाक्षी यांच्या तोडीस तोड अभिनय करत माधुरीने स्वताची लोकप्रियता टिकवली. हम आपके है कौन या चित्रपटाने इतिहास रचला. अबोध चित्रपटापासून सुरुवात करणारी माधुरी दिल तो पागल है मध्ये शाहरुख खानची हिरॉईन झाली. माधुरीने स्वताचे फिल्मी करीयर उत्तम गाजवले. याच माधुरीला गायक सुरेश वाडकरांनी नकार दिला होता. का? ते चला जाणून घेऊया.
माधुरीच्या घरच्यांना माधुरीने लग्न करावे असे वाटत होते. दरम्यान सुरेश वाडकरही फिल्म इंडस्ट्रीत स्थिर होत होते. त्यांची सत्या चित्रपटातील गाणी गाजत होती. सदमा चित्रपटातील ए जिंदगी … अजरामर ठरले होते. परिणामी माधुरी दीक्षितचे वडील सुरेश वाडकरकडे माधुरीचे स्थळ घेऊन गेले होते. परंतु सुरेश वाडकर त्यांच्या करियरवर फोकस होते.सुरेश वाडकरनी माधुरीला लग्नाला नकार दिला. त्याच कारण सांगताना ते म्हणाले ” माधुरी खुपच बारीक आहे. त्यामुळ मला तिच्याशी लग्न करायच नाही.”
हे कारण ऐकून माधुरीचे वडील दुखी झाले होते. नंतर १९९९ साली माधुरीने डॉ श्रीराम नेनेंशी लग्न केले.