
मोडून पडलेल्या संसाराला राष्ट्रवादीचा आधार; खा. सुप्रियाताई सुळेनीं केलं कौतुक !
आग लागून घर भस्मसात झालेल्या १६ कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे काम खा. सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. लोकांना अशा अडचणीच्या वेळी मदतीची गरज असते मात्र अशा वेळी मिळालेला मदतीचा ओघ हा महत्त्वपूर्ण आहे. मदतीचा हात पुढे करत तत्काळ दखल घेणाऱ्या, पाठपुरावा करणाऱ्यांचे चांगलेच कौतुक सुप्रिया ताई यांनी केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बहुली, ता. हवेली येथील १६ घराला १४ मार्च रोजी आग लागली होती. या आगी मध्ये ही घरे भस्मसात झाली होती. सोबतच काही घरांचे नुकसान झाले होते. त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी विनंती जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना केली होती. त्याची तत्काळ दखल खा. सुप्रिया ताई यांनी घेतली. आणि तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी ताईंनी पाठपुरावा करत लक्ष घातले होते.
आज भगतवाडी जळीतग्रस्तांसाठी पुणे जिल्हा परिषदेने प्रती कुटुंब ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे यांनी यासंदर्भातील पत्र जळीतग्रस्त कुटुंबियांना दिले. जळीतग्रस्तांचे संसार आता पुन्हा उभा राहतील याचे समाधान आहे. ही रक्कम मंजूर करुन त्यांना मदत केल्याबद्दल पूजा पारगे यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांचे मनापासून आभार.
अशा आशयाचे ट्विट करून खा. सुप्रियाताई सुळे यांनी कर्तव्यदक्ष रित्या काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक केलं आहे
.