सुप्रिया सुळेंनी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी रुग्णालयाबाहेरच घेतली व्हर्चुअल सभा, कार्यकर्त्यांचा आग्रह राखला आणि लोकांची जिंकली मनं

0

मुंबई : सद्यस्थितीत पंढरपूर पोटनिवडणूक अटीतटीची ठरेल अशी परिस्थिती आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या कोरोनानं झालेल्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरुध्द भाजपनं समाधान अवताडेंना उभं केलं आहे. वस्तुत:ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना, भाजपच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक हाय व्होल्टेज ठरत आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी येथे सभा घेतलेल्या आहेत. १७ तारखेला होत असलेल्या या निवडणुकीन पंढरपूर व मंगळवेढा तालुका भारावून गेला आहे.

या सर्व वातावरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या निवडणुकीत दूरदृश्य प्रणालीचा वापर करत सभा घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या असून सुप्रिया ताई त्यांची काळजी घेण्यासाठी दवाखान्यात उपस्थित आहेत. परंतु राजकारणातील सक्रियता, पक्षाची जबाबदारी तसचं कार्यकर्त्यांचा आग्रह यांमुळे सुप्रिया ताईंनी भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ रुग्णालयाबाहेरच गेटमध्ये व्हर्चुअल सभा घेत, कार्यकर्त्यांचा आग्रह राखत जोश वाढवला तर मतदारांची मन जिंकली.

सुप्रिया ताई म्हणाल्या, आज भारत भालके (नाना) यांची प्रकर्षानं आठवण येत असून, आम्ही ठरवलं होत, पंढरपूर स्वच्छ, सुंदर व सुशोभित करायचं, पाणीप्रश्न नेटानं सोडवायचा; परंतु नाना असे अर्ध्या वाटेत सोडून जातील असं वाटलं नव्हतं. आपण सगळे आज इथे भारत भालके नानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी जमलो आहोत, नानांची अधुरी स्वप्न भगीरथ भालके पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे. पंढरपूरच्या भविष्यकालिन आश्वासक योजनांना मूर्त रूप देण्यासाठी, घड्याळासमोरचं बटण दाबून भगीरथ भालकेंना निवडून द्या, असही आवाहन त्यांनी केलं.

राज्यात लागलेल्या संचारबंदीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘महाविकास आघाडी सरकार कोरोनासंदर्भात संवेदनशील असून, लोकांच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर, या पार्श्वभूमीवर कोविड चेन ब्रेक करण्यासाठी काही तरतूदी तसचं निर्बंध लावणं गरजेचं होतं, ते मुख्यमंत्र्यांनी सर्वानुमते जाहीर केले आहे. याबाबतीत राजकारण अपेक्षित नसून सहकार्याची भूमिका विरोधी पक्षांनी घ्यावी. गरीब, मोलमजूर, फेरीवाले, रिक्षाचालक या प्रत्येक घटकाचा विचार आम्ही केला असून, त्यानुसार मदत जाहीर केली आहे. राज्यातील जनतेनेही स्वतःची काळजी घेत, कोरोना नियमांचं पालन करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.