सुप्रिया सुळेंनी केले गार्गीचे गोड कौतुक…

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतातील झेंडा आणि एक लहान मुलगी हा फोटो महाराष्ट्रभरात फार व्हायरल झालेला आहे. कित्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा फोटो अपलोड करत कौतुक केलेलं आहे. या लहान आणि गोड मुलीचे नाव गार्गी आहेर आहे. चांदोरी,ता.निफाड,जि. नाशिक येथील गार्गी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलीच लोकप्रिय आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने सुप्रियाताई सुळे यांना स्पेशल शुभेच्छा दिल्या होत्या.

आज गार्गी आहेरने आपल्या पालकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खा. सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेतली आहे. स्वतः सुप्रियाताई सुळे यांनी ट्विट करत या बद्दल माहिती दिली आहे. सुप्रियाताई ट्वीट करत म्हणतात की “चांदोरी,ता.निफाड,जि. नाशिक येथील गार्गी आहेर या चिमुरडीने आज तिचे आई वडील सागर व प्रियंका आहेर यांच्यासह भेट घेतली.यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.गार्गीची भेट घेऊन आनंद वाटला. तिला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा”. असे ट्विट करत ताईंनी तिला सदिच्छा देत कौतुक केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.