
या कारणाने कारणाने सुप्रियाताई सुळे यांनी केलं गॅस सिलिंडर वाहकाचे कौतुक….
कोरोनाचा कालावधीमध्ये सेवा देणाऱ्या व्यक्तींचे योगदान हे फार मोठे आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर, आरोग्य सेवक, नर्स इतर कर्मचारी यांचे योगदान आहे त्याचप्रमाणे पेट्रोल पंपावरील कर्मचारी, ड्रायव्हर, पोलीस प्रशासन, पत्रकार व अशा काळात सुद्धा सेवा देणारे सर्व क्षेत्रातील कामगार यांचे योगदान मोठे आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत अशाच एका गॅस सिलिंडर वाहकाची पोस्ट केली आहे.
“कोरोनाचा हा भीषण काळ सुरु असतानाही लोकांची चूल विझू नये यासाठी हे कर्मचारी घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवित आहेत. मावळ येथून मुंबईत कामासाठी आलेले निवृत्ती शिंदे सिलिंडर घरपोच आणून देतात. त्यांचे व सहकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबतच फोटो काढून ही भेट संस्मरणीय केली”. अशा आशयाची पोस्ट सुप्रिया ताई यांनी केली आहे.
सिलेंडर घरपोच आणून देणाऱ्या व्यक्तीची दखल घेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे की काम करणाऱ्या व्यक्तीची दखल घेत ताईंनी त्याच्या कार्याचे कौतुक केले आहे.