शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्याला भगदाड समर्थकाचा २०० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

0

सातारा जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे राजकारण ढवळून निघाले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सरशी असल्याने राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात आहे. अध्यक्ष पद बिनविरोध करण्याकडे सर्वांचे लक्ष असून सगळेजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत.या दरम्यानच राष्ट्रवादीने मेळावे आयोजित करण सुरू केल असून एका मेळाव्यादरम्यान दोघांतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.

परिणामी राष्ट्रवादीने आयोजिलेल्या मेळाव्यामुळे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्ररजे भोसले यांच्यातील राजकारण शिगेला पोचलेय.भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी तब्बल २०० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आमदार शशिकांत शिंदे व दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भोंदवडे या गावात पार पडलेल्या मेळाव्यातआमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर यांनी २०० कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधलेय.हा प्रवेश घेण्यात आल्याने परळी भागातील राजकीय समीकरण चांगलेच ढवळून निघालेय. या प्रवेशामुळे शिवेंद्रसिंहराजे यांची एक हाती सत्ता असणाऱ्या या भागात आता समोर शशिकांत वाईकर यांच्यासारखा तरुण चेहरा विरोधक म्हणून उभा राहिल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.