कढीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा, रेवडीची कढिपत्ता पावडर लंडनच्या बाजारात

0

भारतीय जेवणात कढिपत्ता फोडणीत घातला जातो. खमंगपणा आणि सुवास याबरोबरच कढिपत्त्याचे काही शरीराला उपयुक्त गुणधर्म आहेत ज्यामुळे कढिपत्त्याचा वापर आवर्जून आहारात केला जातो. ताजी रसरशीत कढिपत्त्याची पान फोडणीत घालून पदार्थाची चव दुप्पट केली जाते. कढी, कांदा पोहे, आमटी यात कढिपत्ता हवाच.

याच कढिपत्त्यावर प्रोसेस करत रेवडी कोरेगावच्या कांचन कोचेकर यांनी कढिपत्ता पावडर तयार केली आहे व ती पावडर लंडनच्या बाजारात विकली जाते. कांचन कोचेकर यांनी स्वताच्या शेतात १ एकरात कढिपत्ता लावला आहे तसेच गावातील इतरांकडूनही कढिपत्ता घेतला जातो. कढिपत्ता वेळेवर उचलला गेला नाही तर सुकतो या सुकलेल्या कढिपत्त्याचा वास व चव बदलते परिणामी गिर्हाईक हा कढिपत्ता घेत नाही. या समस्या सोडवण्यासाठी कांचन कोचेकरांनी कृषी आॅफीस गाठल आणि तेथे कढिपत्ता प्रोसेसची माहिती मिळवली. सुरुवातीला कढिपत्ता पावडर मिक्सरला करत होत्या. हळूहळू प्रदर्शनात तसेच छोट्या आर्युवेदीक कंपन्यानी आॅर्डर दिली जी टनावर होती त्यातून भांडवल उभ राहत गेल.

कढिपत्ता तोडून स्वच्छ धुवून घेतला जातो. कांचनताईंनी अहमदाबाद गुजरात येथून ड्रायर मागवला आहे. या ड्रायरमध्ये कढिपत्ता सुकवला जातो ज्यामुळे त्याची चव तसेच रंग, वास बदलत नाही. सुकवलेल्या कढिपत्त्याची पल्वलायझरमध्ये पावडर केली जाते. आता या पावडरचे २५ ग्रॅम, ५० ग्रॅम असे आकर्षक पॅकींग केले जाते. हा कढिपत्ता लंडनमध्ये पोहोचवायला एका ओळखीच्या घरी लंडनच्या स्त्री राहायला आल्या होत्या त्यांना या कढिपत्ता पावडरची माहिती कळाली आणि त्यांनी ही पावडर लंडनच्या बाजारात नेली.
कांचन कोचेकर म्हणतात आपल प्रोडक्ट चालण्यासाठी हायजीन, आकर्षक पॅकींग आणि दर्जा कायम ठेवा. धंद्यात तोटा झाला तर घाबरू नका तोटा का झाला याची माहिती कृषी खात्याकडून घ्या. मदत मागा आणि करा. स्थानिकाना रोजगार द्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.