कोरोना नियंत्रणासाठी अजित दादा पवारांची पंचसूत्री जाहीर होणार कडक अमंलबजावणी

0

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका होत रुगणसंख्या कमी करणे,मृत्यू दर कमी करणे आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करणे अशाप्रकारे समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

राज्यात यापूर्वीच काही नियमावली लागली असून त्यात जमावबंदी,संचारबंदी,विकेंड लॉकडाऊन यांचा समावेश आहे.नुकतीच अजित पवारांनी यासंदर्भात एक बैठक घेतली व त्यात पंचसूत्री जाहीर करत त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे सूतोवाच केले.

अजित पवारांनी पुढील पंचसूत्री जाहीर करत त्यानुसार निधी उपलब्धता व इतर उपाययोजनांची तरतूद स्पष्ट केली.

1. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 30 टक्के निधी कोरोना उपाययोजनांवर करण्यात येईल जेणेकरून रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील.

2. राज्यात काही ठिकाणी बेडची कमतरता जाणवत आहे परंतु या उपाययोजनांमुळ बेड,औषध,रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल.राज्यात बेडची कमतरता,आॅक्सीजनची कमतरता,लसीकरण,तसेच अहवाल मिळण्यास विलंब या सर्वांवरही चर्चा करत अजित पवारांनी बाका प्रसंग असून रुग्णाचा जीव वाचवण आपल नैतिक कर्तव्य असल्याच स्पष्ट केल.

3. सध्या राज्यात रेमेडिसेव्हरचा तुटवडा जाणवत असून नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर येत आंदोलन केल होत,यासर्वांवर नियंत्रण याव यासाठी राज्यात रेमेडिसेव्हर थेट रुग्णालयात दिले जातील व तेथूनच ते गरजू रुग्णाला दिले जातील,तसेच खाजगी अधिग्रहित रुग्णालयात खर्चाची तरतूद करण्यात येईल व त्यावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवतील.

4. रुग्णांना आॅक्सीजन व्हेंटीलेटरची कमतरता जाणवत असून त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी लिक्विड आॅक्सीजन प्लँट,हवेतील आॅक्सीजन तयार करणे अशा प्रकारच्या योजनांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी,तसेच औद्योगिक आॅक्सिजनपैकी जास्तित जास्त आॅक्सीजन कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात यावा.

5. राज्यात मृत्युदर वाढला असून मृतदेह दहनासाठी स्मशानभूमी कमी पडत आहेत,यावर उपाययोजना म्हणून नगरोत्थान समिती कडून विद्युत दाहिनी,गॅस दाहिनी इत्यादी उपाययोजना कराव्यात व त्यासाठी निधी उपलब्ध करावा.
दरम्यान राज्यात लाॅकडाऊनचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.