
घरी कोणीही पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना ऋतुनुसार पेय देतो, परंतु बारमाही जी पेय दिली जातात त्यात चहा, कॉफी यांचा समावेश होता. उन्हाळ्यात मात्र सरबत, कोल्ड ड्रिंक दिल जात. परंतु ग्रामीण भागात मात्र घरी आल्यानंतर गुळ पाणी किंवा ताक देण्याची पध्दत असून ही पध्दत अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषत: ताक पोटासाठी, त्यासाठी तसेच लिव्हरसाठी अतिशय उपयुक्त आहे.
आपल्याला जर जेवण झाल्यावर जड वाटणे, अपचन होणे, आंबट, करंट ढेकर येणे, बध्दकोष्ठता, गॅस, जळजळ अशा समस्या जाणवत असतील तर ताक पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, पोटाची आंतडी मऊ पडतात. अन्न पुढे जाऊन पोट साफ राहते, त्यामुळे गॅस होत नाहीत. ताक पित्त शामक आहे, त्यामुळे जळजळ थांबते. ढेकर बंद होतात. ताक पिण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण झाल्यानंतर एक वाटी ताक प्यावे. रात्री कधीही ताक पिऊ नये. ताक नुसत पित उत्तमच पण येथे पाचक ताकाची रेसिपी आपण बघणार आहोत.
साहित्य
१) ताक – १ वाटी
२) सैंधव मीठ – पाव चमचा
३) पुदीना पाने – ४
कृती
सैंधव व पुदीना पाने एकत्र वाटून घ्या व हे मिश्रण ताकात मिसळा व ताक ढवळा. हे ताक दुपारच्या जेवणानंतर वाटीभर प्या. हा उपाय किमान महिनाभर करा. ताक ताजच प्या. रात्री दही लावावे व सकाळी ताक करून दुपारी ते प्यावे. हे ताक तृष्णा शामक असून आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यात ताकाचे अनेक फायदे जाणवतात.
वरील उपाय आवडल्यास आमच्या पेजला नक्की लाईक करा.