
महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजा भवानीचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा २ ची सुरुवात!
कोरूना च्या दुसऱ्या लाटेच्या अगोदर राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेची पहिली यात्रा संपन्न झाली आता दुसरी लाट निवळल्याच्या नंतर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन २४ जून पासून होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेची सुरुवात करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथुन सुरुवात होणार आहे तर ४ जुलै रोजी बीड येथे समारोप होणार आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकाधिक विस्ताराच्या दृष्टीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा दृष्टीने असल्याचे समजते आहे. २४ जुन रोजी सकाळी १० वाजता जयंत पाटील हे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करतील. तर बीड येथे ४ जुलै रोजी समारोप होणार आहे!