पोटाचा घेर कमी करण्यासाठीचा डायट प्लॅन आज लगेचच सुरू करा.

0

सुटललेल पोट ही समस्या सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळत असून दैनंदिन व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आहारात अरब, चरबी पदार्थ खात असतो. परिणामी पोट सुटायला लागत. आहारात तेलकट, मैदायुक्त पदार्थ असल्यास पोट वाढण्याची समस्या वाढते. पोट वाढल्यामुळे आरोग्याच्या इतर समस्याही निर्माण होऊ शकतात. जसे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबेटीज इत्यादी. सुटलेल पोट नियंत्रणात आणण्यासाठी सकस आहार तसेच व्यायामाची नितांत गरज असते. आज आपण सुटलेल पोट आणि वजन नियंत्रणात ठेवणारा डायट प्लॅन पाहणार आहोत.

१) सकाळी ६.३० ते ७.०० या दरम्यान एक ग्लास मेथीचे भिजवलेले दाणे ( साधारण अर्धा चमचा ) पाणी प्या. यामुळे चयापचय क्रिया सुधारून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
२) सकाळच्या नाश्त्याला एक प्लेट पोहे किंवा इडली खा. साधारण ७.३० ते ८.३० या दरम्यान १० वाजता १ ग्लास फळांचा रस प्या.
३) दुपारच्या जेवणात साधारण १२.३० ते १.०० चपाती भाजी असल्यास २ चपात्या भाजी आणि भाकरी असल्यास १ भाकरी, भाजी, कोशिंबीर आणि एक वाटी ताक प्या.
४) संध्याकाळच्या नाश्त्याला एक वाटी मोड आलेली कडधान्य, गाजर, बीट, मुळा, काकडी असे सॅलड खाऊ शकता.
५) रात्रीच्या जेवणात एक वाटी पालेभाजी, अर्धी भाकरी, दही, कोशिंबीर, सलाम यांचा समावेश करा.

वरील डायट प्लॅन किमान महिनाभर करण गरजेच असून या प्लॅनबरोबर सायकलिंग, योगा, जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम आवर्जून करावा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.