रात्री निरस दूध आणि ही एक वस्तू लावा चेहऱ्यावर या नैसर्गिक ब्लिचने सकाळी चेहरा होईल गोरा चमकदार

0

प्रत्येकाच्या स्कीनचा टोन निराळा असतो, म्हणजेच कोणाची स्कीन आॅयली असते, कोणाची ड्राय असते तसेच कोणाची मध्यम, प्रत्येकाने स्वताच्या स्कीन टोननुसार फेसपॅक लावावा. त्वचेचा रंग उजळणे तसेच निखार येणे यासाठी चेहर्यावर वेगवेगळे फेसपॅक लावले जातात. पार्लरमध्ये प्रामुख्याने ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो, आज आपण एक घरगुती पॅक बघणार आहोत जो रोज रात्री तुम्हाला आठवडाभर लावायचा आहे.

साहित्य

१) निरस म्हणजेच न तापवलेल दूध  – ४ चमचे

२) कोरफड जेल  – २ चमचे

३) गुलाब जल  – १ चमचा

कृती

कच्च दूध,  कोरफड जेल किंवा घरात कोरफड असेल तर कोरफडीचा गर व गुलाब जल एकत्र मिक्स करा. हा पॅक रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर कापसाने लावा. चेहरा न बोलता किमान अर्धा तास ठेवा. अर्धा तासाने चेहरा कोमट पाण्याने धावा. नेहमी लक्षात ठेवा फेसपॅक लावल्यावर कधीही बोलू नका अन्यथा सुरकुत्या पडतात. हा उपाय सलग आठ दिवस करायचा आहे. सकाळी मऊ, मुलायम, उजळ, नितळ चेहरा होतो.

कच्च्या दुधाने स्कीन टोन सुधारतो डेड स्कीन दूर होऊन चेहरा चमकदार होतो. कोरफडीने चेहर्यावरचे डाग जातात, त्वचा मुलायम होते तसेच त्वचेवरील इन्फेक्शन दूर होते. गुलाब जल उत्तम टोन तसेच चेहरा उजळवणारी रूममधील आहे. हा उपाय आवडल्यास आमच्या पेटला लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.