सुप्रिया ताई सुळे यांना सोशल मीडियावर ‘स्पेशल शुभेच्छा’; सोशल मीडिया ताईमय!

0

महाराष्ट्रातील लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस सर्वपक्षीय शुभेच्छांनी स्पेशल बनला आहे मनातील भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत सुप्रिया ताई सुळे यांचा असणारा स्नेह पोस्ट च्या माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून दिसून येत आहे.

शिवसेना नेते तथा खा. संजय राऊत म्हणतात की “मुलगी, आई,बहीण,पत्नी अशा यशस्वी भुमिका वठवून संसदपटू म्हणून तळपणारया @supriya_sule यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा”! आशा आशा ची ट्विट करत संजय राऊत यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या राजकारणाच्या पाठीमागील व राजकारणातील कर्तुत्वाचा उल्लेख करत सदिच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया ताई सुळे यांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये जाऊन केलेल्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या आहेत जयंत पाटील म्हणतात की “गेली बारा वर्ष लोकसभेत महाराष्ट्राचे अत्यंत सक्षमपणे प्रतिनिधित्व करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज बनलेल्या, राष्ट्रवादीच्या लोकसभेतील गटनेत्या, संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा”!

धनंजय मुंडे म्हणतात की “आमच्या जेष्ठ भगिनी, राष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न आदरणीय सुप्रिया ताई, आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. जनसेवेसाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे”. धनंजय मुंडे यांनी ज्येष्ठ भगिनी तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांना वैद्य नाथाच्या चरणी प्रार्थना करत शुभेच्छा दिले आहेत.

संसदेत महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘संसद महारत्न’ खासदार @supriya_sule ताई (आत्या) आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना. आशा आशयाच्या शुभेच्छा आ.रोहित पवार यांनी दिल्या आहेत.

आज सोशल मीडियावर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे वाढदिवसाच्या निमित्त प्रचंड शुभेच्छा दिल्या जात. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असाही उल्लेख पोस्ट मध्ये केला जातो आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.