खा.अमोल कोल्हे यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या आजोबांचे स्पेशल प्रेम !

0

राजकारणामध्ये जितकं पक्ष विचारधारा निष्ठा या गोष्टींना महत्त्व असतं तितकंच महत्त्व उमेदवाराच्या स्वच्छ व्यक्तिमत्वाला असते. प्रामाणिक हेतूने आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसा वरती जीव ओवाळून टाकणारे कमी नाहीत. असाच अनुभव खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये आला आहे.

कार्यक्रमावरून जात असताना अचानक एका शेतकऱ्याने गाडी अडवली. या शेतकऱ्यांचे नाव होतं, गजानन कोरेकर. गाडी थांबताच मी काच खाली करून नमस्कार करताच श्री. कोरेकर पाचशेची नोट पुढे करीत म्हणाले, “साहेब, याचे पेढे घ्या.” क्षणभर मला हा प्रकार समजेना. मग त्यांनीच स्पष्टीकरण दिलं. “साहेब, तुम्ही निवडून आलात की मी तुम्हाला पेढे देईन असं म्हटलं होतं. लोकसभा निवडणूक जिंकून तुम्ही खासदार झालात. पण आपली भेट झाली नाही. आज आपण अचानक आलात त्यामुळे पेढे आणता आले नाहीत, म्हणून पेढे घेण्यासाठी पैसे देतोय.” त्यांचं हे विलक्षण प्रेम पाहून खरंच मनस्वी आनंद झाला.

अमोल कोल्हे म्हणाले की, “दादा पैसे राहू द्या.पुढच्या वेळी येईन तेव्हा मीच तुम्हाला पेढे घेऊन येईन.”
“खरं तरं श्री. कोरेकर हे भाजपचे कार्यकर्ते. पण माझ्या विजयासाठी त्यांनी पक्ष बाजूला सारत निवडून येण्यासाठी मदत केली होती. या निवडणुकीत मी निवडून आलो. परंतु त्यासाठी आपापले पक्ष बाजूला ठेवून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी माझं मनापासून काम केलं होतं. थोडक्यात सांगायचे तर, ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. मला विजयी करण्यासाठी संपूर्ण जनता एकवटली होती.

अशा आशयाची पोस्ट करत खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघामध्ये मिळणाऱ्या प्रेमावर भरभरून लिहिले आहे. इतकं प्रेम फारच कमी लोकप्रतिनिधींना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.