
सोनू सूदला भेटली भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला…
कोरोनाच्या महामारी मध्ये अभिनेता सोनू सूद याने केलेली मदत सर्वश्रुत आहे. त्याने मागील वर्षी सुद्धा नागरिकांना धान्य, औषधे, जाण्यासाठी खर्च, तसेच वाहनाची व्यवस्था अशा प्रकारची व्यवस्था केली होती. सोनू सूद सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांना सुपरहिरो होऊन मदत करताना दिसत आहे अडचणी अडचणीच्या वेळी सोनू सूद हा नागरिकांना आधार वाटतो आहे.
सोनू सूद याने नागरिकांना मदत करत असताना. नागरिकांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणत सोनू सूद च्या फाऊंडेशन ला मदत केली आहे. सोनू सूद यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट करत मला भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला भेटली अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्या महिलेच्या मनाचा मोठेपणा पाहत सोनू सूद ने सुद्धा कौतुक केले आहे. मुलीचं नाव बोड्डू नागा लक्ष्मी आहे. ती एक युटयूबर सुद्धा आहे. सोनू सूदचं काम पाहून देशचं नव्हे तर विदेशी लोकसुद्धा सोनूचे चाहते झाले आहेत. मात्र सोनू या मुलीचा चाहता बनला आहे.
तिने सूद फौंडेशनमध्ये 15,000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला आहे. हा पैसा तिच्या 5 महिन्यांच्या पेन्शनचा आहे. ही माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचही दुख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असं नाही…