सोनिया गांधींची मोदींना भावनिक साद; अनाथ मुलांच्या भविष्या साठी केलं आवाहन!

0

कोरोना मुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. लहान मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले आहे; त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे या बाबतीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

गुरुवारी लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या बाबतीत, मुलांच्या भविष्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. अनाथ झालेल्या मुलांना केंद्र सरकारने नवोदय विद्यालयात शिक्षण द्यावे असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. ही सूचना गांभीर्याने घ्यावी अशी विनंती राहुल गांधी यांनी केली आहे.

अनेक बालकांनी आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शिक्षणाची, भवितव्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबात जबाबदार व्यक्ती नसल्याने केंद्र सरकारने अशा बालकांच्या संगोपनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सोनिया गांधींनी केले आहे. या मुलांच्या उज्वल भविष्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असेही त्या म्हणाल्या आहेत. सोबतच नवोदय विद्यालय ही संकल्पना राजीव गांधी यांनी रुजवली आहे, तसेच देशातील महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पा पैकी हा एक राजीव गांधी यांचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे हे सुध्दा त्यांनी सांगितले आहे.

सोनिया गांधी यांनी जी मागणी केली आहे ती मागणी महत्त्वपूर्ण आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करणे हे आपले सर्वांचे निश्चित कर्तव्य आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.