सोनालीने चाहत्यांसमोर विनामेकप येऊन, डागांबद्दल दाखवली सकारात्मकता.

0

चाहत्यांना नेहमी आपल्याला आवडणारे अभिनेते, अभिनेत्री हे त्यांच्या खाजगी आयुष्यात कसे राहतात?काय करतात?कसे दिसतात याची उत्सुकता लागून असते.मग त्या छोट्या पडदयावरची असो किंवा मोठ्या.अनेक चाहते आपल्याला आवडणाऱ्या अभिनेता किंवा अभिनेती यांचे अनुकरण करत असतात. नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने समाज माध्यमांवर तिचा विनामेकप फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या फोटो मध्ये तिच्या चेहऱ्यावरचे डाग स्पष्ट दिसत आहेत.

आजही मुलगी मोजूनमापून पाहण्याची संस्कृती काही ठिकाणी सुरु आहे. मुलगी हि दिसायला सुंदर असावी ,सुंदर नसेल तर तीला खूप काही भोगावं लागत असे म्हणले जाते. पण या फालतू विचाराला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा विनामेकप फोटो पोस्ट करत उत्तर दिले आहे. डागांचा स्वीकार करून स्वत:च्या न्यूनगंडावर विजय मिळवल्याचं ती सांगते.

ती पुढे म्हणते “माझ्या डागांविरुद्ध लढण्यास आणि न्यूनगंडावर विजय मिळवण्यासाठी मदत करण्यास भाग्यश्री गुप्ते आणि डर्माविला यांचे खूप खूप आभार. गेल्या चार महिन्यांत तुम्ही माझ्यात आतून बदल घडविला आहे. अजून तीन महिने उरले आहेत आणि या तीन महिन्यांत तुम्ही मला कुठे पोहोचवाल हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या दिवसासाठी या प्रवासाची सुरुवात केली असली तरी आता हे माझं डेली रुटीन झालं आहे’,

गेल्या वर्षी सोनालीचा साखरपुडा पार पडला. यावर्षी ती कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या दिवसासाठीच सोनालीने तिच्या चेहऱ्यावरील डागांसाठी उपचाराला सुरुवात केली होती. आता हा प्रवास ‘डेली रुटीन’ झाल्याचंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

सोनाली मितवा, नटरंग, हिरकणी, पोश्टर गर्ल, क्लासमेट, धुरळा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसंच डान्सिंग क्वीन या रियॅलिटी शोमध्ये सोनाली परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनालीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.