
काही असंतुष्ट आत्मे सरकारवर टीका करताहेत – उदय सामंत
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने उत्कृष्ट काम केलं आहे. या कामाची दखल ही देश विदेशातून घेतली गेली. महाराष्ट्राचे पालकत्व स्वीकारत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या संकटाचा संयमाने सामना केला आहे.
राज्य सरकारने कोरोना परिस्थितीचा चांगला सामना केला आहे. राज्य सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. मात्र काही असंतूष्ट आत्मे सरकारवर टिका करत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हांज एकालाही प्रत्युत्तर दिले नाही मात्र आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वांना उत्तर दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र काही लोकांच्या हे पचनी पडत नाही ते बोलत आहेत. अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली.
सांगली जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा कार्यालयात ते व्हेंटीलेटर मशिन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ‘शिवसेना नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याच सामाजिक हेतूने या मशिन दिल्या आहेत असेही ते या वेळी म्हणाले!